आशुतोष मसगौंडे
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
2019 मध्ये राष्ट्रवादी पक्ष एकत्र असताना अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वात मोठा विजय मिळवला होता.
अजित पवार यांनी 2019 मध्ये भाजपच्या गोपिचंद पडळकर यांचा 2 लाख 33 हजार 461 पराभव केला होता.
यंदा राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळे शरद पवार आणि अजित पवार विधानसभेत पहिल्यांदा आमनेसामने असणार आहेत.
दरवेळी अजित पवार यांच्या विरोधात असणारी भाजप पहिल्यांदाच अजित पवार यांचा प्रचार करणार आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.
गेली अनेक निवडणुकींमध्ये लाखोंचे मताधिक्य घेणारे अजित पवार यंदा कशी कामगिरी करणार याकडे सध्या सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.