धनश्री भावसार-बगाडे
आखाड पार्ट्या सध्या जोरात आहेत. यात व्हेज खाणारे लोक अंड्यांच ऑप्शन घ्यावं की, नाही या संभ्रमात असतात.
शाकाहारी लोक शक्यतो अंड खाणं टाळतात. अगदी केकमध्येही अंड आहे की, नाही हे बघतात.
तर दुसरा असाही मतप्रवाह आहे की, अंड मांसाहारी नाहीच.
अंडी बहुतांश पक्षांची किंवा काही प्राण्यांची असतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे अंडी नॉनव्हेज आहेत असं समजलं जातं.
ज्यात कोणत्याही प्राण्याची, पक्षाची ऊती किंवा पेशी नसतात अशा पदार्थांना शाकाहारी म्हणतात.
त्या अर्थाने अंड शाकाहारी असतं असं मानायला हवं. यासाठी जिवंत कोंबडीला मारण्याचीही आवश्यकता नसते.
अंड्याच्या पांढऱ्या भागात पेशी किंवा ऊती नसतात. त्यामुळे अंड शाकाहारी आहे, असे म्हणता येईल.
अंड्याच्या पिवळ्या बलकात पुनरुत्पादक पेशी आणि गेमेट सेल बनणं शक्य आहे.
जर ही अंडी फलीत झाली, पेशी तयार झाली तर मात्र अंड मांसाहारी आहे असं म्हणता येईल.
बाजारात मिळणारी अंडी ही अनफर्टीलाइज्ड असतात. त्यामुळे त्यांना शाकाहारी अंडी म्हणता येतील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.