धनश्री भावसार-बगाडे
नॉनव्हेज बिर्याणीचे चाहते अनेक आहेत. पण जे नॉनव्हेज नाही खात ते सुद्धा खास वेगवेगळ्या भाज्यांनी बनलेली बिर्याणीचे शौकीन असतात. यासाठी वेगवेगळ्या भाज्या, ड्रायफ्रूट्स वापरले जातात.
व्हेडज बिर्याणी ३ स्टेप्समध्ये बनवली जाते. पहिले भात शिजवला जातो. मग भाज्या खड्या मसाल्यामध्ये शिजवतात. मग भात आणि भाज्यांचा एक एक थर लावला जातो.
व्हेज बिर्याणीमधला हा प्रकार व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्या दोघांनाही फार आवडतो. याची चव नॉन व्हेज सारखी येते.
यात आधी फणस दह्यासोबत मॅरीनेट केलं जातं. यात खडे मसाले, आले, लसूण, केशर असे पदार्थ घातले जातात. फणस शिजवल्यावर पुन्हा भातासोबत कुकरमध्ये टाकून शिजवलं जातं.
मटण पसंत करणाऱ्यांना मटन बिर्याणी फार आवडते. मटन मंडी बिर्याणीचे शौकीनही बरेच बघायला मिळतात.
मटन मंडी बिर्याणी मटन स्टॉकमध्ये शिजवली जाते. त्यामुळे बिर्याणीत याची एक्स्ट्रा टेस्ट येते. साध्या नॉनव्हेज बिर्याणीपेक्षा याची चव जरा हटके असते.
हैद्राबादी बिर्याणी बरीच लोकप्रिय आहे. या बिर्याणीला हैद्राबादी दम बिर्याणीसुद्धा म्हटलं जातं. ही एक अत्यंत लोकप्रिय डिश आहे.
हैद्राबादी बिर्याणी बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा तांदूळ, चिकनपासून बनवतात. असं म्हटलं जातं की, हैद्राबादच्या निजामांच्या किचनमधली ही चविष्ट रेसिपी आहे.
साधारणपणे चिकन आणि मटण बिर्याणीच खाल्ली जाते. पण जर तुम्ही फीश खाण्याचे शोकीन असाल तर मालाबार फीश बिर्याणी नक्की ट्राय करा. दक्षिण भारतात ही बिर्याणी मोठ्याप्रमाणात पसंत केली जाते.
मालाबार फिश बिरयाणी बनवण्यासाठी मालाबार फीश भातासोबत शिजवला जातो. यात कांदा, सुकामेवा, टोमॅटोसहित इतर वस्तू वापरल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.