Anuradha Vipat
बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार अनेकदा त्याच्या पत्नीचं कौतुक करताना दिसतो.
नुकतीच अक्षयनं जिओ सिनेमावरील ‘धवन करेंगे’ या टॉक शोला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून बुद्धिमत्ता मिळते. मी तर एक अशिक्षित माणूस आहे. जास्त शिकलोही नाही. मी मजुरासारखी कामं करतो आणि ती डोकं चालवून चलाखीनं काम करते.
अक्षय पुढे म्हणाला, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मी राजेश खन्ना यांच्या मुलीशी लग्न केलं आहे
अक्षय पुढे म्हणाला की, ट्विंकल एक चांगली पत्नी आणि चांगली आईदेखील आहे. जर तुम्हाला जीवनात योग्य जोडीदार मिळाला, तर तुमचं आयुष्य परिपूर्ण होतं.
माझी पत्नी आजही तिच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोणातून पाहते याचं खरंच मला आश्चर्य वाटतं असंही अक्षय म्हणाला