Anuradha Vipat
चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारची एक जाहिरात नक्कीच पाहायला मिळते.
यात अक्षय कुमार 'नंदू'ला सिगारेट न ओढण्याचा सल्ला देताना दिसतो.
ही जाहिरात इतकी वर्षे चित्रपटगृहात सुरू आहे की प्रेक्षकांना जाहिरातीतील संवाद पाठ झाले आहेत.
मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसीने या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएफसीने असे का केले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अक्षय कुमारची ही जाहिरात पहिल्यांदा २०१८मध्ये दाखवण्यात आली होती.
या जाहिरातीत अजय सिंह पालने नंदूची भूमिका साकारली होती.