Anuradha Vipat
चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी ट्विंकल खन्ना सध्या चित्रपट जगतापासून दूर आहे. मात्र, तिने एक लेखिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
सध्या अभिनेत्री तिच्या नवीन पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज'मुळे चर्चेत आहे.
ट्विंकल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्यात आणि अक्षय कुमार यांच्यात एक रंजक संवाद घडत आहे.
ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली व्हिडिओ क्लिप तिच्या 'वेलकम टू पॅराडाइज' या पुस्तकाच्या लाँचची आहे.
या क्लिपमध्ये ट्विंकल खन्ना स्टेजवर बसलेली दिसत आहे, तर तिचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार तिला काही प्रश्न विचारत आहे.
अक्षय कुमार ट्विंकल खन्नाला अतिशय मजेशीरपणे विचारतोय, 'तुमच्या 'वेलकम टू पॅराडाईज' या पुस्तकातील सर्व प्रमुख पात्र महिला आहेत... मग आता पुरुष असणे 'अप्रासंगिक' झाले आहे का?'
हा प्रश्न ऐकून ट्विंकल हसत हसत म्हणते, 'नाही, अजिबात नाही! जसे खाल्ल्यानंतर गोड काहीतरी हवे असते, त्याचप्रमाणे सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्या सोबत पुरुषांची गरज असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.