Anuradha Vipat
अभिनेत्री अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.
नुकताच एका नाटकासाठी अक्षयाला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे
यानिमित्ताने खास पोस्ट शेअर करत अक्षयाने जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष हा सगळा अट्टहास केला त्याचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही असं अक्षयाने पोस्टमध्ये लिहिल आहे
माझे नाना गिरणी कामगार होते आणि त्याच बरोबर नाटकांमध्ये काम करायचे. त्यांना कधी भेटले नाही मी पण जितकं ऐकलंय त्यावरुन माहितीये, की आज ते जिवंत असते तर उत्तम नट असते आणि कुठेतरी त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करतेय असंही अक्षयाने पोस्टमध्ये लिहिल आहे
अक्षयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तसेत अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अक्षयाचं कौतुक केलं आहे.