Monika Lonkar –Kumbhar
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या सणाला विशेष असे महत्व आहे.
वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 'अक्षय तृतीया' असे म्हटले जाते.
अक्षय्य तृतीया हा अनेक कारणांसाठी वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो.
पौराणिक मान्यतेनुसार सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून झाली होती. त्यामुळे, या दिवसाला खास महत्व आहे.
अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, अनेक जण या दिवशी खरेदी करण्यावर भर देतात.
भगवान विष्णूंनीही याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता, असे मानले जाते. भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय्य तृतीयेला झाला होता, अशी देखील धार्मिक मान्यता आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची देखील खास पूजा केली जाते. ज्यामुळे, घरात ऐश्वर्य, समृद्धी नांदते, अशी लोकांची श्रद्धा आहे.