कपूरांच्या सुनेने नेसली ऐतिहासिक साडी, 160 वर्ष जुन्या साडीत आलिया भट्ट चा स्वॅग

सकाळ डिजिटल टीम

अनंत राधिकाच्या लग्नात अलियाची एन्ट्री होता सर्वांच्या नजरा रोखल्या त्या म्हणजे तिच्या साडीवर.
राधिका अनंतच्या लग्नात बी टाऊनची चुलबुली अलिया भरजरी गुलाबी साडीत दिसली.
पण तुम्हाला माहितीय का अलियाची ही भरजरी साडी साधीसुधी नसुन ऐतिहासिक आहे.
अलियाच्या ही साडी 160 वर्षापूर्वीची आहे. याबद्दल तिनं स्वतः आपल्या इंस्टावर माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाने प्युअर सिल्क आणि जरी बॉर्डरने जडलेली साडी नेसली होती.
ही साडी 160 वर्षे जुनी असून खास गुजरातमध्ये बनवण्यात आली होती.
99% शुद्ध चांदी आणि अंदाजे 6 ग्रॅम सोन्याने बनवलेली जरीची बॉर्डर या साडीला आहे.
ही साडी मनीष मल्होत्राच्या प्रतिष्ठित आर्काइव्हल वीव्ह कलेक्शनचा एक भाग आहे.
ही साडी भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीचे त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करते.