Monika Lonkar –Kumbhar
जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरूवात झाली आहे. या सोहळ्याला हॉलिवूड, बॉलिवूडसहीत जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
या सोहळ्याला अभिनेत्री आलिया भट्ट, तिचा पती अभिनेता रणबीर कपूर आणि त्यांची मुलगी राहाने देखील हजेरी लावली आहे.
या सोहळ्याला आलियाने निळ्या रंगाच्या स्टायलिश गाऊन परिधान केला आहे. याचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आलिया या स्टनिंग लूकमध्ये खूपच भारी दिसत असून यावर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या सोहळ्याला आलियाने हा कॉकटेल पार्टी परफेक्ट लूक कॅरी केला आहे. या लूकवर साजेसा तिचा मेकअप आणि ज्वेलरी खुलून दिसतेयं.
आलियाच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. या लूकमधून आलिया हॉलिवूडच्या तारकांना टक्कर देतेय अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.