सकाळ डिजिटल टीम
सध्या सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.
त्यांच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीने.
यावेळी आलियाने केलेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता.
आलियाने तिच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि ते चांगलेच चर्चेत आहेत.
काळे आणि पांढरे मोत्यांचा हेवी वर्क असेलेलं क्रॉप टॉप आणि लेहेंगा आलियाने घातला होता.
आलियाने यावेळी मिनिमम मेकअप आणि कमी ज्वेलरी घातली होती. तिचा हा लूक सगळ्यांनाच पसंत पडला.
आलियाचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला असून सोशल मीडियावर तिचं कौतुक होतंय.