साक्षी राऊत
बाजारात विकल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी या भेसळयुक्त असतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अशात तुम्हीही भेसळयुक्त बदाम तर खात नाहीये? कसे ओळखाल?
सगळ्यात आधी बदाम बाजारात विकत घेताना त्याचा रंग निरखून बघा. बदाम बनावटी असेल तर त्याचा रंग गडद असतो. तर खऱ्या बदामचा रंग फिकट असतो.
बनावटी बदामची चव थोडी कडवट असते. तर खऱ्या बदामच्या चवीत अजिबात बदल नसतो. ती चवीला गोडसर लागते.
तुमची बदाम बनावटी असेल तर सगळ्यात आधी बदाम हातावर घ्या आणि ते हाताने रगडून बघा, बदाम बनावटी असेल तर ती हातावर हलका रंग सोडेल.
तुम्हाला खऱ्या बदामची पारख करायची असेल तर बदाम कागदाने दाबून बघा. बदाम खरी असेल तर कागदावर तेलाचे डाग पडतील.
बदाम विकत घेताना कधीही ती पॅक असावी. तसेच कायम कमी वजनाच्या बदाम विकत घ्याव्यात.
बदाम एअर टाइट डब्ब्यात किंवा फ्रिजरमध्ये ठेवा. बदाम व्यवस्थित साठवून न ठेवल्यास त्यातील पोषक गोष्टी कमी होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.