Job Scam टाळण्यासाठी 'या' पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नोकरीचा शोध हा प्रत्येक गरजवंतासाठी महत्वाचा विषय असतो. पण यामध्ये फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडतात.

Job Scam

पैसे देऊनच कामं होतात, हा भ्रम अनेकदा आपल्या डोक्यात असतो. हा भ्रम आणि अंधश्रद्धा आजिबात बाळगता कामा नये.

Job Scam

अनेकदा कन्सलटन्सीद्वारे नोकऱ्या ऑफर केल्या जातात. यासाठी तुम्हाला एक पगारही द्यावा लागू शकतो, त्यामुळं शक्यतो थेट कंपनीशी कनेक्ट होण्यास प्राधान्य द्या.

Job Scam

तुम्ही नोकरीसाठी अर्ज केलेला नसतानाही जर तुम्हाला कोणी नोकरी ऑफर करत असेल तर सावध राहा.

Job Scam

योग्य आयडीवरुनच मेल आलाय का चेक करा, कारण प्रोफेशनल कंपन्या ऑफिशिअल डोमेनवरुन मेल करतात, जीमेल किंवा याहू या जनरल डोमेनवरुन करत नाहीत.

Job Scam

तुम्हाला आलेली जॉब ऑफरची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देखील आहे का? हे तपासून पाहा. थर्ड पार्टी वेबसाईटवर अशी माहिती असेल तर प्रतिसाद देऊ नका.

Job Scam

मुलाखत न घेताच तुम्हाला नोकरीवर रुजू करुन घेतलं जात असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका. कारण तुमच्या क्षमता समोरासमोर तपासल्याशिवाय कोणीही नोकरी देत नाही.

Job Scam

सरकारी अथवा खासगी नोकरी लावून देतो म्हणून जर कोणी तुम्हाला पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा म्हणत असेल तर यात उघडपणे फसवणूक होणारच हे लक्षात ठेवा.

Job Scam