Amit Ujagare (अमित उजागरे)
टेस्ट अॅटलास हा पारंपारिक खाद्य पदार्थांसाठीचा एक प्रायोगिक ऑनलाईन मार्गदर्शक प्लॅटफॉर्म आहे.
दरवर्षी या प्लॅटफॉर्मकडून जगभरातील १० सर्वोत्तम डीशची यादी जाहीर केली जाते. यंदा आंब्यापासून बनवलेल्या डीशची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यंदा यामध्ये दोन भारतीय डीशचा समावेश झाला आहे, विशेष म्हणजे यामध्ये मराठमोळ्या 'आमरस पुरी' या डीशनं अव्वल स्थान पटकावलं आहे.
भारताच्या पश्चिम राज्यातील विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आमरस सर्वाधिक आवडची डीश आहे.
त्याचबरोबर कैरीच्या चटणीनं या यादीत पाचवं स्थान मिळवलं आहे.
तसंच या यादीत थायलंडच्या मँगो स्टिकी राइसनं दुसरा क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वी कैरीच्या चटणीचा जगातील सर्वश्रेष्ठ ५० डीशच्या यादीत समावेश झाला होता.
तर यंदाच्या टेस्ट अॅटलासच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फिलिपिन्सची सॉर्बेटिस.
चौथ्या स्थानी इंडोनेशियाच्या रुजक या डीशनं स्थान मिळवलं आहे.