Anuradha Vipat
अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे
'दसवी’ या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी स्क्रीन शेअर केली होती.
त्यावेळी निम्रत कौरच्या अभिनयाची प्रसंशा करणारे पत्र बिग बींनी लिहिले होते.
या पत्रात बिग बींनी म्हटले आहे की, आपण क्वचितच भेटलो किंवा बोललो आहे. याआधी वायआरएफच्या एका कार्यक्रमात मी तुझे कॅडबरीच्या जाहिरातीसाठी कौतुक केले होते
पुढे या पत्रात बिग बींनी म्हटले आहे की, मात्र ‘दसवी’ चित्रपटात ज्या पद्धतीने तू काम केले आहेस ते उल्लेखनीय, अपवादात्मक आहे. मी तुझे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत.
सध्या अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर हे रिलेशनशिपमध्ये आहेत या चर्चांना उधाण आले आहे.