सकाळ डिजिटल टीम
ड्रायफ्रुट्समध्ये बहुतेक लोक काजू, पिस्ता, बदाम आणि अक्रोड खातात. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की पिस्ता, बदाम, अक्रोड, काजू यापैकी कोणते फळ सर्वात शक्तिशाली आहे.
बदामामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात.
यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड, प्रोटीन, ओमेगा 3, फायबर, पोटॅशियम देखील समाविष्ट आहे.
काजूमध्ये प्रथिने, फायबर, जस्त, तांबे अशा अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. काजू हे पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे.
काजूमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे वजन नियंत्रणात मदत करते.
अक्रोड बद्दल बोलायचं झालं तर यात ओमेगा 6, ओमेगा 3, फॉस्फरस, लोह, सेलेनियम कॉपर, मिनरल्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात.
फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, प्रथिने यांसारखे पोषक घटक पिस्त्यात आढळतात.
आरोग्य तज्ञांच्या मते, अक्रोड हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवनाने आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. एका व्यक्तीने दिवसभरात ६ ते ७ बदाम, ४ ते ५ काजू, दोन ते तीन अक्रोड आणि ४ ते ५ पिस्ते खावेत, असे आरोग्य तज्ञ सांगतात.