Payal Naik
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अमरीश पुरी यांच्या मृत्यूला आज १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. २२ जून रोजी त्यांचा स्मृतिदिन असतो.
त्यांनी बॉलिवूडमधील सगळ्यात भयंकर व्हिलन साकारला होता. त्यांची ओळख ही नकारात्मक भूमिकांपुरतीच नव्हती.
२००३ साली त्यांचा 'जाल द ट्रॅप' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला होता.
तेव्हा त्यांना रक्त द्यावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना मायलोइड्सप्लास्टिक सिंड्रोम या आजाराची लागण झाली.
मात्र त्यांनी त्या परिस्थितीतही पाच चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलं.
शेवटी त्यांची भूक कमी झाली. त्यांना अस्वस्थपणा येऊ लागला. शेवटच्या दिवसात ते घरीच होते.
मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलाने त्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी 'कालपेक्षा मी बरा आहे' असं सांगितलं.
हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले. त्यानंतर ते घरात पडले आणि त्यांचं निधन झालं.