Anuradha Vipat
मराठी चित्रपटांबरोबरच अमृता खानविलकरने हिंदी चित्रपटात आणि वेब मालिकांमध्येही काम केलं आहे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लुटेरे’ या ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वरील वेब मालिकेत ती एकटीच स्त्री भूमिकेत आहे
याबद्दल बोलताना अमृता म्हणाली, हिंदी आणि मराठी भाषेत काम करताना फारसा फरक जाणवत नाही .दोन्ही भाषांत काम करताना कलाकारांना समान मेहनत घ्यावी लागते.
आपल्याला कामाचा आनंद मिळतो तोपर्यंत आपण मनापासून काम करावे, मग त्यात भाषेचे बंधन नसले पाहिजे’ असे ठाम मत अमृताने व्यक्त केले.
मला स्वत:ची प्रगती करणे किंवा नवनवीन गोष्टी आत्मसात करणे थांबवायचे नाही आहे’ असेही तिने सांगितले.
यामधून रोज माझ्या आयुष्यात काय घडते? माझा दिवस कसा जातो हे लिहून काढायला मी शिकले, असेही तिने सांगितले.