अमृताने केली अंकिताची कॉपी ; कोणावर खुलून दिसतोय मोरपिशी रंगाचा लेहेंगा ?

सकाळ डिजिटल टीम

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या मोरपिशी रंगातील लेहेंग्यावर केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

सुंदर लेहेंगा

चंदेरी फुलांचं प्रिंट आणि मोरपिशी रंग असं कॉम्बिनेशन असलेल्या या लेहेंग्यामध्ये अमृता सुंदर दिसतेय. ड्रामा ज्युनिअर्स या झी मराठीवरील कार्यक्रमासाठी तिने हा लेहेंगा परिधान केला होता.

अंकिताची कॉपी ?

सागरिका राय या फॅशन डिझायनरने डिझाईन केलेला लेहेंगा पाहून अनेकांना लगेच अंकिता लोखंडे आठवली. कारण अंकिताने असाच लेहेंगा बिग बॉस सीजन १७ मध्ये परिधान केला होता. यावरून अमृता आणि अंकिताची तुलना सुरु झालीये.

अंकिता लोखंडे

बिग बॉस सीजन १७ मध्ये अंकिता तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहिली.

चाहते भिडले

यावेळी एका वीकेंडच्या वारला तिने या लेहेंग्यामध्ये हजेरी लावली. यावरून आता अमृता आणि अंकिताचे चाहते भिडले असून या लेहेंग्यामध्ये कोण सुंदर दिसतं अशी स्पर्धाही त्यांच्यात रंगली आहे.

व्हायरल

सागरिका रायने हा डिझाईन केलेला लेहेंगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी असा लेहेंगा कुठे मिळेल अशी विचारणाही सोशल मीडियावर केली आहे.

लेहेंग्याची वैशिट्य

प्युअर सिल्क मध्ये शिवलेला हा लेहेंगा आणि त्यावरील मीनाकारी नक्षी नेटकऱ्यांना आवडली आहे.

Nana Patekar
नानांनी घेतलेला कारगिलच्या युद्धात सहभाग - येथे क्लिक करा