Anuradha Vipat
जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
परितोष त्रिपाठी यांची कविता तिने शेअर करत या कवितेने माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे हेमांगीने सांगितले आहे
हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल चित्रीकरणादरम्यान तू कविता सादर केली आणि माझे डोळे भरून आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली ते आम्हाला पुन्हा गुलाम आणि दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही हेमांगीने म्हटले.
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे या कार्यक्रमात हेमांगी कवी ही अभिनेता कुशल बद्रिकेसह सहभागी होणार आहे.
9 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.