Anuradha Vipat
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमांना शुक्रवारपासून जामनगरमध्ये सुरुवात होणार आहे.
लग्नाच्या तयारीदरम्यान अनंत यांनी होणारी पत्नी राधिका मर्चेंटचं कौतुक केलं आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना अनंत म्हणाले, “मी नशीबवान आहे की राधिका माझ्या आयुष्यात आली. ती माझी स्वप्नातील राणी आहे.
पुढे ते म्हणाले की, जेव्हा मी राधिकाला भेटलो तेव्हा मला कळलं की ती माझ्यासारखीच आहे. तिच्या मनात प्राण्यांबद्दल आदर आहे आणि तिला प्राण्यांची काळजी घ्यायला खुप आवडतं
अनंत यांना लहानपणापासूनच आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. त्यांना लठ्ठपणा आहे
“राधिकाने वजन कमी करण्याच्या प्रवासात मला खूप साथ दिली आहे. माझ्या कठीण काळात राधिका नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली,” असं अनंत म्हणाले आहेत.