Monika Lonkar –Kumbhar
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा नुकताच १२ जुलैला मुंबईत पार पडला.
राधिकाला लग्नात गुजराती वधूप्रमाणे सजायचे होते, त्यासाठी तिने या पानेतर ब्रायडल लेहेंग्याची निवड केली होती.
या लेहेंग्यात राधिका राजकुमारीप्रमाणे सुंदर दिसत होती. तिचा हा लेहेंगा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.
ब्रायडल लूक समोर आल्यानंतर राधिकाचा आता विदाई लूक अर्थात पाठवणी करतानाचा लूक प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
राधिकाने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला सुंदर लाल-गोल्डन रंगाचा लेहेंगा पाठवणीच्या (विदाईच्या) वेळी परिधान केला होता.
विशेष बाब म्हणजे तिचा हा लेहेंगा अस्सल सोन्याचा होता.
या लेहेंग्यावर सोन्याचे जरदोसी वर्क केले असून, तिने सोन्याचे वर्क असलेला करचोबी ब्लाऊज परिधान केला होता.
या क्रीम-गोल्डन रंगाच्या पानेतर लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत होती.