सकाळ डिजिटल टीम
कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ, मराठमोळ्या अंदाजात जेनेलियाचा सगळ्यांमध्ये हटकेपणा पाहायला मिळाला.
'बाराती' म्हणत अनन्याने अंबानींच्या लग्नासाठी केलेल्या खास पेहरावाचे फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले.
९० च्या दशकापासून आपल्या सौंदर्यावरुन सर्वांना वेड लावणाऱ्या ऐश्वर्या रॉयने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला असून ती आजसुद्धा तेवढीच सुंदर दिसत आहे.
गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये किर्ती सेनॉनने हटके अंदाजात हजेरी लावली.
मुंज्या चित्रपटामधून वेगळी भूमिका साकारणारी शर्वरी सध्या चांगलीच चर्चेत आहे, अशातच तिने देखील यावेळी अंबानींच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली.
लग्नात लाल रंगाचा लेहंगा परीधान करून कियाराने पती सिद्धार्थ सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
'छोटी सरदारनी' मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निमरत कौर आपल्या कूल अंदाजात दिसून आली.