Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे.
घरात बाहुल्यांरुपी बाळांना सांभाळण्याचा टास्क सुरू असताना घन:श्यामने संचालकांकडे अंकिताने त्याला हात मारल्याचा आरोप केला होता.
यावर टास्क संपल्यावर अंकिताने धनंजय पोवार यांच्याकडे घन:श्यामबद्दल तक्रार केली.
राग अनावर होऊन अंकिताने मला घन:श्यामला कानाखाली मारलंसं वाटतंय असंही म्हटलं आहे.
पुढे अंकिताचं म्हणणं ऐकल्यावर धनंजय तिला शांत राहण्याचा सल्ला देतात.
तसेच पुढे असे विचार मनात आणायचे नाहीत असंही तो अंकिताला सांगतो
अंकिताचा हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांच्या घन:श्याम विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत