सकाळ ऑनलाईन टीम
अंजीर महिलांसाठी वरदान ठरतं. तेव्हा याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात असलेले फायबर वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे, कारण त्यात कॅलरीज देखील खूप जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
अंजीरमध्ये आढळणारे झिंक, मॅग्नेशियम आणि लोहासारखी खनिजे प्रजनन आरोग्याला चालना देतात. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे ते हार्मोनल असंतुलन दूर करते. यासोबतच महिलांच्या पीएमएसच्या समस्येवर अंजीर खाणे फायदेशीर आहे.
वयानंतर महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत, तज्ञ अनेकदा निरोगी आहार घेण्याचा सल्ला देतात. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही यासाठी अंजीर खाऊ शकता. वास्तविक, वाळलेले अंजीर लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे.
वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये सांधे आणि हाडांच्या वेदनांची समस्याही लक्षणीय वाढते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ही समस्या वारंवार होऊ लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आजपासूनच अंजीर खाणे सुरू करा.
आजकाल बहुतेक महिला हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडतात. अशा परिस्थितीत तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी अंजीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
अंजिर खाण्याचे महिलांना फायदेच फायदे आहे तेव्हा आजपासूनच अंजीर खाणे सुरु करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.