Anuradha Vipat
अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले संपल्यावर १५ दिवसांनी गावी मालवणात गेली आहे.
यावेळी अनेक महिन्यांनी घरी आलेल्या अंकिताचं औक्षण करून आईने तिचं स्वागत केलं.
अंकिताचं स्वागत तिच्या घरी अगदी साध्या पण, सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलं होतं .
याबाबत आता एका युजरने तिच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट केली आहे.
युजरने पोस्टवर लिहिलं आहे की, कोकणात गावी गेली ही मुलगी…कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही. यावरून कळतं की किती कोकण हार्टेड मुलगी आहे ही...
यावर अंकिताउत्तर देत म्हणाली, उगीच नकारात्मक काहीतरी बोलण्यापेक्षा स्वत:वर लक्ष द्या.
अंकिता वालावलकर वैयक्तिक आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे