Anuradha Vipat
‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अंकिता वालावलकर
Bigg Boss च्या पाचव्या सीझनमध्ये अंकिताच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली ती म्हणजे तिचे बाबा पहिल्यांदाच मुंबईत आले होते.
बाबा मुंबईत आल्यावर अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात होती. त्यामुळे आपलं कौतुक करण्यासाठी आलेल्या वडिलांसाठी अंकिताने खास भावुक पोस्ट लिहिली आहे.
खास व्हिडीओ अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
पोस्टमध्ये अंकिताने लिहिलं आहे की, “माझे बाबा मुंबईत आले तो क्षण पाहण्यासाठी मी त्यांच्याबरोबर नव्हते. पण त्यांनी मुंबई थोडीफार…त्यांना एका दिवसात जेवढं जमलं तेवढी पाहिली.
पोस्टमध्ये अंकिताने लिहिलं आहे की, ते ‘बिग बॉस’च्या घरात आले. खरंच हा क्षण मी आयुष्यात विसरू शकणार नाही.
पोस्टमध्ये अंकिताने लिहिलं आहे की, Bigg Boss मध्ये मला व्होट मिळावेत यासाठी बाबा स्वत: प्रयत्न करत होते ही माझ्यासाठी खरंच आश्चर्याची गोष्ट होती. हे सगळं मी कधीच विसरू शकणार नाही.