अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

सुपरस्टार

अंकुश चौधरीला मराठी कलाविश्वातील सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं.

Ankush Chaudhary

प्रेक्षकांच्या भेटीला

आता लवकरच अंकुश एका नव्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ankush Chaudhary

फेसबुक पोस्ट

या नाटकाची घोषणा करताना अंकुशने एक पोस्ट फेसबुकवर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ankush Chaudhary

दुनियादारी

पोस्ट फेसबुकमध्ये अंकुशने लिहिलं आहे की, नमस्कार, मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्षे मी या मुंबई शहरात राहतोय. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी...

Ankush Chaudhary

मुंबईकरांचं अस्तित्व

कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच असंही अंकुशने पुढे लिहिलं आहे

Ankush Chaudhary

भूमिपुत्रांची गोष्ट

एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहोचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार ‘तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे अस अंकुशने पुढे लिहिलं आहे

भूमिपुत्र

अंकुशने पुढे लिहिलं आहे, २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल तुमचा मित्र आणि गिरणगावचा भूमिपुत्र अंकुश चौधरी

सुनील शेट्टीने सांगितला दिवंगत वडिलांचा 'तो' संघर्ष

येथे क्लिक करा