सकाळ डिजिटल टीम
काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) ट्युलिपच्या फुलांचा (Tulip flower) वार्षिक हंगाम सुरू झाला असून राजधानी श्रीनगरमधील उद्यानांत सुमारे सात लाखांहून अधिक ट्युलिप फुलत आहेत.
राज्याबाहेरील पर्यटकांबरोबर ती स्थानिकांनाही आकर्षित करत आहेत.
प्रसिद्ध दल सरोवरापासून अवघ्या काही मीटरवर असणारे इंदिरा गांधी स्मृती ट्युलिप उद्यान (Indira Gandhi Memorial Tulip Garden) नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी उद्यानात गर्दी करणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यांवरही आनंद फुलला होता.
विविध प्रजातींचे लाखो ट्युलिप पाहणे ही देशविदेशातील पर्यटकांसाठी अनोखी पर्वणीच असते.
उद्यानात पर्यटकांची झुंबड उडत असतानाच येत्या काही दिवसांत ट्युलिप पूर्णपणे बहारात येण्याचा अंदाज आहे.
या उद्यानात लाल, पिवळा, गुलाबी आदी रंगांतील ट्युलिपची रंगपंचमीच पर्यटकांना पाहायला मिळेल.