Anuradha Vipat
अभिनेता सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सारा हिने मोठं वक्तव्य केलं आहे.
‘कितीही काहीही झालं तरी, तुमच्यासाठी कोणी येत नाही…’ असं सारा म्हणाली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि तिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत साराला, ‘तुझ्या आयुष्यात सशक्त महिलांचा प्रभाव काय आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर सारा म्हणाली, ‘मला असं वाटतं सिंगल मदरसोबत राहणं सर्वात महत्वाची भूमिका आहे. फार कमी वयात मला कळलं होतं, की कोणी तुमच्यासाठी काहीही करणार नाही…’