अपारशक्ती खुराणाच "तेरा नाम सुनके" नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अपारशक्ती खुराणा हा एक उत्तम अभिनेता तर आहे पण तो एक उत्तम संगीतकार गायक देखील आहे. नुकतच त्याच 'तेरा नाम सुनके' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे.

Aparshakti Khurana's new song

आजही तितकच ट्रेंड मध्ये

या पूर्वी "कुडिये नी" या त्याच्या गाण्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि गाणं सुपरहिट ठरलं. 25 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून हे गाणं आजही तितकच ट्रेंड मध्ये आहे.

Aparshakti Khurana's new song

हृदयस्पर्शी संगीतमय कथा

अपारशक्तीचे 'तेरा नाम सुनके' हे गाणं एक हृदयस्पर्शी संगीतमय कथा भावपूर्ण गीत यांचं अनोखं मिश्रण आहे. निर्मान यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणं अभिनेत्री निकिता दत्ता हिच्या सोबत शूट करण्यात आल आहे.

Aparshakti Khurana's new song

काम करण्याचा प्रयत्न करत राहणार

आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलताना अपारशक्ती म्हणतो " मला वाटते की मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करतोच आहे आणि अजून नवनवीन काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.

Aparshakti Khurana's new song

हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी

ज्युबिलीसाठी बॅक टू बॅक पुरस्कार जिंकणे बर्लिनच्या सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळणे , होस्टिंग , गाणी या सगळ्या गोष्टी मला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. माझ्या म्युझिक प्रोजेक्ट् सिंगल "कुडिये नी" ला इंस्टाग्राम आणि स्पॉटिफाईवर खूप प्रेम मिळाल्यानंतर आता हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे.

Aparshakti Khurana's new song

उंच भरारी घेत राहणार

'तेरा नाम सुनके' चाहत्यांना आणि संगीत रसिकांना अपारशक्ती खुराणा यांच्या संगीत प्रवासाची अनोखी झलक दाखवणार तर आहेच आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या 'बर्लिन' या चित्रपटाच्या यशानंतर अपारशक्ती उंच भरारी घेत राहणार आहे.

Aparshakti Khurana's new song

या माहितीपटात तो झळकणार

बर्लिन व्यतिरिक्त अपारशक्ती पुढे बहुप्रतीक्षित "स्त्री 2" मध्ये दिसणार आहे आणि अॅप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित "फाइंडिंग राम" या आकर्षक माहितीपटात तो झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aparshakti Khurana's new song