Anuradha Vipat
सोनाली कुलकर्णी हिला आपण प्रसिद्ध अभिनेत्री सोबतच एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ही ओळखतो.सोनालीने अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात तिने लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत तिच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत सोनाली कुलकर्णीला 'सो कूल' नावानेही ओळखले जाते.गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'चेलुवी' या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
१९९२ साली आलेल्या या सिनेमाने राष्ट्रीय पारितोषिक मिळवले होते. इतकंच नाही, तर दिल्ली, लंडन, कान्स फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखविला गेला होता.'फुओको दी सु' या इटॅलियन सिनेमातील भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णीला २००६ साली मिलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला.
सोनालीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये अग्निवर्षा,कितने दूर कितने पास,कैरी,घराबाहेर, जहा तुम ले चलो, जुनून, टॅक्सी नंबर ९२११, डरना जरूरी है, डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दायरा,दिल चाहता है, दिल विल प्यार व्यार, देवराई,दोघी,प्यार तूने क्या किया, ब्राईड अँड प्रेज्युडिस,मिशन कश्मिर,मुक्ता,सखी,सिंघम प्रमुख आहेत. या वर्षी तिचा प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला.
तिला "फूक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. तिने "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपले अभिनय कौशल्य दाखवले.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सोनालीचं लग्न झालं होतं. मात्र त्याच्यात काही मतभेद झाले त्यामुळं फार काळ त्यांचं हे नाते टिकू शकले नाही आणि २००७ साली दोघांचा घटस्फोट होऊन दोघे विभक्त झाले.
२०१० मध्ये सोनालीनं नचिकेत पंतवैद्यबरोबर आपला दुसऱ्यांदा लग्न केलं. नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये एम.डी. पदावर कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.