Monika Lonkar –Kumbhar
सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. परंतु, आरोग्यासोबत सफरचंद हे त्वचेसाठी देखील तितकेच फायदेशीर आहे.
हिवाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंदाची देखील मदत घेऊ शकता.
सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.
हा फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम करेल. हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सफरचंद, दही आणि लिंबाचा रस लागेल.
सर्वात आधी सफरचंद मिक्सरला बारीक करून घ्या.आता या सफरचंदाच्या पेस्टमध्ये २-३ चमचे दही मिसळा. त्यानंतर, त्यात लिंबाचा रस मिसळा. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
मधामुळे आपल्या त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते. सफरचंद आणि मधाचा हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळेल आणि पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.
हा फेस पॅक बनवण्यासाठी सफरचंदाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. आता, या पेस्टमध्ये १ चमचा मध आणि १ चमचा हळद मिसळा.आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.