आंघोळीपूर्वी नाभीवर तूप लावा अन् मिळवा आरोग्यदायी फायदे; 'हे' आजार होतील दूर

सकाळ डिजिटल टीम

नाभीवर तूप लावण्याचे फायदे

आयुर्वेदानुसार, नाभीला शरीराच्या ऊर्जेचे केंद्र मानले जाते. रोज नाभीवर देशी तूप लावल्याने व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

Navel Ghee Health Benefits

देशी तुपात कोणते घटक असतात?

देशी तुपात असलेले व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म उत्तम आरोग्यासोबतच सुंदर त्वचेचं तुमचं स्वप्न पूर्ण करतात.

Navel Ghee Health Benefits

त्वचा सतत चमकत राहते

नाभीवर तूप लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करते, त्यामुळे त्वचा सतत चमकत राहते.

Navel Ghee Health Benefits

पचनक्रिया सुधारते

आयुर्वेदानुसार, नाभी हे पचनाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी तूप लावल्याने पाचक एंझाइम सक्रिय होतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Navel Ghee Health Benefits

बद्धकोष्ठतेच्या समस्या

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी देशी तुपाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी नाभीत तुपाचे २-३ थेंब टाकून हलक्या हाताने मसाज करा. नाभीत तूप टाकल्याने पचनक्रिया सुधारते.

Navel Ghee Health Benefits

सांधेदुखी

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर नाभीत तूप लावल्याने आराम मिळतो. सर्वप्रथम नाभीमध्ये तुपाचे काही थेंब टाकून नाभीभोवती मसाज करा. हा उपाय केल्याने सांधेदुखी दूर होईल.

Navel Ghee Health Benefits

वात दोष दूर होतो

आयुर्वेदानुसार, नाभीवर तूप लावल्याने वात दोष दूर होतो. जेव्हा वात असंतुलित होते, तेव्हा व्यक्तीला चिंता, अस्वस्थता आणि पचनसंस्थेमध्ये विकार होऊ लागतात; पण तूप रामबाण उपाय ठरु शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Navel Ghee Health Benefits

'ही' फळं शरीरातील Vitamin B6 ची कमतरता भरून काढतात, जाणून घ्या कोणती?

Vitamin B6 Fruits Benefits | esakal
येथे क्लिक करा