kimaya narayan
रात्रीस खेळ चाले, बिग बॉस मराठी सीजन 4, आभास हा या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे.
तिने साकारलेली शेवंताची भूमिका सुपरहिट ठरली तर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी ही भूमिकाही अनेकांना आवडली.
अतिशय वेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत राहणाऱ्या अपूर्वाचं वैयक्तिक आयुष्य मात्र फार खडतर ठरलय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेले वाईट अनुभव शेअर केले. तिच्या वडिलांचं निधन त्यापाठोपाठ भावाचंही निधन या दोन धक्क्यांमुळे तिचं आयुष्य बदलल्याचं तिने सांगितलं होतं.
इतकंच नाही तर अपूर्वाने तिचा घटस्फोट आणि डिप्रेशनचा काळ याबद्दलही तिने सांगितलं.
तिचे वडील गेल्यानंतर लगेच तिच्या घटस्फोटाची सुनावणी होती आणि तो काळ तिच्यासाठी खूप डिप्रेशनचा होता असं तिने म्हटलं. तिने काही वर्षं संसार केला आणि त्यापूर्वी ती त्या व्यक्तीबरोबर दहा वर्षं रिलेशनशिपमध्ये होती.
रोहन देशपांडेपासून घटस्फोट झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्या काळात तिने फक्त काम केलं आणि मानसोपचार तज्ञांकडून तिने उपचार करून घेतले असं तिने उघड केले.