सकाळ डिजिटल टीम
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरासमोरील (Harnai Port Dapoli) सागरी परिक्षेत्र हे ‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल’चे (Whale Fish) हॉटस्पॉट असल्याची नोंद भारतीय वन्यजीव संस्थेने केली आहे.
संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मच्छीमारांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या हॉटस्पॉटच्या ठिकाणी लवकर शास्त्रज्ञांकडून व्हेलचा ‘अकूस्टिक’ म्हणजेच ध्वनिविषयक अभ्यासाला सुरुवात होणार आहे.
प्राण्यांना असणारे धोके हे या सर्वेक्षणाचे प्राथमिक लक्ष होते. यामध्ये हम्पबॅक व्हेल वारंवार दिसल्याच्या ठिकाणी त्यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्रातील डहाणू, ससून बंदर, बोर्ली, हर्णे, वेलदूर आणि तारकर्ली या सहा प्रमुख बंदरांवर सर्वेक्षण झाले. यामध्ये ४०० मच्छीमारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यामध्ये हर्णे बंदराचे सागरी परिक्षेत्र ‘अरेबियन सी हम्पबॅक व्हेल’चे हॉटस्पॉट असल्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे.
'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'' हा अरबी समुद्रात आढळणारा दुर्मिळ सागरी सस्तन प्राणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.