Anuradha Vipat
अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. मात्र त्यांचे ब्रेकअप झालं.
अरबाज आणि शुराच्या लग्नापूर्वी जॉर्जियाने काही मुलाखती दिल्या, त्यामध्ये तिने तिच्या व अरबाजच्या ब्रेकअपबद्दल बरेचा खुलासे केले होते .
आता एका मुलाखतीत अरबाजने जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल केलेले खुलासे यावर भाष्य केले आहे. ‘ माझ्या लग्नादरम्यान, जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल जी मुलाखत दिली, जी वक्तव्य केली ती योग्य नव्हती. असं त्याचं म्हणण आहे
अरबाजने जॉर्जियावर निशाणा साधला आहे. ‘ दोन वर्ष उलटून गेल्यानंतर आणि मी जेव्हा लग्न करत होतो, तेव्हाच ब्रेकअपबद्दल बोलणं, हे खूपच चुकीचं आहे असंही तो म्हणाला
काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने मुलाखतीत केलेली वक्तव्य, अरबाजला आवडली नाहीत, हे यातून स्पष्ट होतं आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. पण मार्च 2016 मध्ये दोघे विभक्त झाले आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.