Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी ५’ या शोमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यात खूप जवळचे नाते निर्माण झाले होते.
अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यात दोघांमध्ये रोमँटिक क्षणही पाहायला मिळाले.
आता अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याविषयी सांगितले आहे
मुलाखतीत अरबाज म्हणाला की, माझ्या घरच्यांनी याची कधीच पर्वा केली नाही. ते मला म्हणाले की शोमध्ये काहीही झालं तरी मीडियात येऊ देऊ नकोस.
पुढे मुलाखतीत अरबाज म्हणाला की, मी त्यांना सांगितलं की या शोमध्ये अनेक गोष्टी घडू शकतात. माझ्या वडिलांनी खरोखरच माझी खूप काळजी घेतली आणि मला सांभाळून घेतलं.
अरबाज पुढे म्हणाला की, मी पप्पांना सांगितले की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या नाहीत.
अरबाज पुढे म्हणाला की, मी त्यांना सांगितले की माझ्या शोमधील प्रत्येकजण आमच्या विरोधात होते फक्त आम्ही एकमेकांसोबत होतो.