kimaya narayan
कपिल शर्माचा गाजलेला द ग्रेट इंडियन कपिल शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. यातील सगळीच कास्ट आणि शोमधील परीक्षक अर्चना यांची चर्चा कायमच असते.
दरवेळी प्रमाणे यावेळीही कपिलने अर्चना यांची खूप मस्करी केली. त्यांचं वय, पर्सनल लाईफ यावरून त्याने खूप त्यांना चिडवलं.
यावर नुकतंच बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत अर्चना यांनी भाष्य केलं.
अर्चना म्हणाल्या कि,"मला अशा परिस्थितीचा सामना करता येतो. या प्रोफेशनमध्ये मी गेली १ ० -१ ५ वर्षं आहे. मी आयुष्याला आणि लोकांच्या बोलण्याला इतकं मनावर घेत नाही."
"प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम सुरु आहेत. जर कुणी मस्करी करतंय तर आपणही ते हसण्यावारी का नाही नेत?" असं त्या म्हणाल्या.
"तो जर माझी मस्करी करतोय तर त्याची ती आनंद वाटण्याची पद्धत आहे. आणि हसणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ही लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर जोक्स करतात ते मला आवडत." असं त्या म्हणाल्या