'हे' खाद्यपदार्थ चुकूनही कच्चे खाऊ नका, आरोग्याचं करु शकतात मोठं नुकसान

सकाळ डिजिटल टीम

'या' गोष्टी कच्च्या खाऊ नका

चांगले आरोग्य राखण्यासाठी लोक सहसा आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करण्याची शिफारस करतात. पण, जर तुम्हाला ही फळे आणि भाज्या खाण्याची योग्य पद्धत माहित नसेल, तर तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Fruits and Vegetables Harmful

जंतू साफ होत नाहीत

काही भाज्या आणि फळे फ्रूट क्लिनरने धुवून तुम्ही त्याच्यातील कीटकनाशके आणि दूषित पदार्थ काढून टाकू शकता. परंतु, तरीही डॉक्टर अशी फळे किंवा भाज्या न खाण्याचा सल्ला देतात.

Fruits and Vegetables Harmful

बटाटा

कच्चा बटाटा तुमची चवच खराब करत नाही, तर तुमच्या पचनाशी संबंधित समस्या देखील निर्माण करू शकतो. कच्चे बटाटे खाल्ल्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होऊ शकतो.

Fruits and Vegetables Harmful

कोबी कुटुंबातील भाजीपाला

कोबी कुटुंबातील भाज्या जसं की फुलकोबी, ब्रोकोली आणि स्प्राउट्स कच्च्या स्वरूपात खाणे टाळावे. या भाज्यांमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण पचण्यास कठीण असतं. या भाज्या कच्च्या खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात.

Fruits and Vegetables Harmful

वांगी

वांग्यामध्ये सोलॅनिन नावाचे संयुग असते, जे कॅल्शियमचे शोषण रोखते. शरीरातील सोलॅनिन विषारीपणामुळे मळमळ, चक्कर येणे, उलट्या होणे यासह अनेक न्यूरोलॉजिकल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.

Fruits and Vegetables Harmful

लाल राजमा

कच्च्या किंवा कमी शिजलेल्या राजमामध्ये मोठ्या प्रमाणात विष, ग्लायकोप्रोटीन लेक्टिन असते. जे सेवन केल्याच्या काही तासांत एखाद्या व्यक्तीमध्ये मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

Fruits and Vegetables Harmful

मशरूम

बरेच लोक मशरूम कच्चे देखील खातात. पण, त्यात असलेली पोषकतत्त्वे चांगली मिळवायची असतील तर ते शिजवून खा. यासाठी तुम्ही तळलेले, ग्रील्ड मशरूमचे सेवन करू शकता. अशा मशरूममध्ये कच्च्या मशरूमपेक्षा जास्त पोटॅशियम असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Mushroom

Mustard Oil and Garlic Benefits : मोहरीचं तेल आणि लसणाचा वापर 'या' समस्यांवर आहे रामबाण उपाय!

Mustard oil and Garlic Benefits | esakal
येथे क्लिक करा