Pranali Kodre
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ खेळले जात आहे. त्यासाठी जगभरातील देशातील खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये वास्कव्यास आहेत.
यादरम्यान या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी अर्जेंटिनाच्या संघात एक रोमँटिक घटना सर्वांनी पाहिली.
अर्जेंटिनाच्या हँडबॉल पुरुष संघाचा खेळाडू पाब्लो सिमोनेटने त्याची गर्लफ्रेंड आणि अर्जेंटिना महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कॅम्पॉय हिला ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये लग्नाची मागणी घातली.
यावेळी अर्जेंटिनाचे खेळाडू आजूबाजूला होते आणि त्यांना चिअर करत होते. तसेच काहींनी हा क्षण मोबाईलमध्येही कैद केला.
यावेळी पाब्लो आणि मारिया दोघेही भावूक झाले होते.
पाब्लो आणि मारिया २०१५ पासून एकत्र असून त्यांना आपापल्या संघासाठी गेल्या वर्षी अमेरिका गेम्समध्ये सुवर्णपदकही जिंकले होते.
पाब्लोचे दोन्ही मोठे भाऊ दियागो आणि सिबॅस्टिअन अर्जेंटिनाकडून ऑलिम्पिकमध्ये हँडबॉल खेळले आहेत.
तसेच पाब्लो आणि मारिया हे २०१६ ऑलिम्पिकवेळीही अर्जेंटिना संघाचा भाग होते.