सकाळ डिजिटल टीम
खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीबरोबर चार ग्रेटर तर तीन जुवेनाइल परदेशी पाहुणे गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहित, अग्निपंख) येरळवाडी (ता. खटाव) मध्यम प्रकल्पातील पाणथळीच्या भागात आगमन झाले आहे.
खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलावात रोहित पक्ष्यांचे थवे थंडीत वास्तव्यात येतात.
यातील सूर्याचीवाडी तलावात अपुरा पाणीसाठा असल्याने येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगोंनी हजेरी लावली आहे.
हे पक्षी पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत, तर भारतात कच्छच्या रणात मोठ्या प्रमाणात आढळतात.
या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कमी थंडीच्या म्हणजेच दुष्काळी तालुक्यात हे पक्षी हजेरी लावतात.
त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणांसह स्थानिक पक्षीमित्रांची पावले तलावाकडे वळतात.
सध्या वडूजपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. त्यातील चार हे ग्रेटर फ्लेमिंगो व तीन तरुण अर्थात जुवेनाइल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. (फोटो : अंकुश चव्हाण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.