हास्यजत्रा फेम दादूस उर्फ अरुण कदम यांच्या नातवाला पाहिलं का ?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम गेल्यावर्षी आजोबा झाले. त्यांच्या मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आणि लवकरच त्यांच्या लाडक्या नातवाचा पहिला वाढदिवस आहे.

अरुण यांच्या नातवाचं नाव अथांग असं असून १९ ऑगस्टला त्याचा पहिला वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच एक खास फोटोशूट करण्यात आलं.

खास जंगल थीममधील फोटोशूट यावेळी करण्यात आलं आणि हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

‘Sugar In Frame’ या सोशल मीडिया पेजवरुन अथांगचं फोटोशूट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

त्याची मस्ती आणि आजोबांबरोबर असलेला बॉण्ड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

अरुण यांची मुलगी सुकन्या कदम-पोवळे अथांगचे क्युट फोटो चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करत असते.

अथांगचा त्याच्या फॅमिलीबरोबरच बॉण्ड सगळ्यांनाच आवडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेतनच्या आलिशान घराची झलक - येथे क्लिक करा