Anuradha Vipat
अभिनेत्री अरुणा इराणी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कुकू कोहली व त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे.
अरुणा इराणींनी म्हणाल्या, त्या आणि कुकू कोहली आधी एकमेकांचा तिरस्कार करायचे. “’कोहराम’ सिनेमा करताना मी कुकुजींना भेटले.
त्या पुढे म्हणाल्या, “कधीकधी ते मला दिवसभर सेटवर बसवून ठेवायचे, मला कुकूजी अजिबात आवडायचे नाही आणि त्यांनाही माझा राग होताच. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक ते माझ्याशी नम्रपणे वागू लागले
पुढे बोलताना त्या म्हणाल्या मग त्यांनी माझ्या शुटिंगच्या तारखा अॅडजस्ट करायला सुरुवात केली आणि याचदरम्यान आम्ही प्रेमात पडलो.
लग्नाची माहिती लपवून ठेवण्याचा आणि मुलं होऊ न देण्याचा निर्णय का घेतला यावर त्या म्हणाल्या, मला ते विवाहित आहेत हे माहित होतं. कसंतरी आमचं लग्न झालं. मुलं जन्माला न घालणं हा आमच्यासाठी योग्य निर्णय नव्हता. पण माझ्याशी लग्न करण्यासाठी ते सर्वांशी भांडले होते