Anuradha Vipat
फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्री रेखाचे फोटो शेअर केले आहेत
जे फोटो पाहताक्षणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
रेखा यांच्या घायाळ करणाऱ्या अदा या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या वेळी रेखा यांनी एका नृत्याचं सादरीकरण केलं होतं.
यासाठी त्यांचा हा लूक मनिष मल्होत्रानं डिझाईन केला होता.
रेखा यांनी वेअर केलेला हा बनारसी कल्ली लेहंगा होता
या लेहंग्यावर जरदोसी एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं.