सकाळ डिजिटल टीम
'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना गौरविण्यात आले.
यानिमित्ताने वारकऱ्यांसह मुख्यमंत्री शिंदे यांनी फेर धरला, तसेच शिंदेंनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह फुगडी देखील घातली.
पाऊस कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती होऊ लागलीये, त्यामुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही सगळ्यांची जबाबदारी असल्याचे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमाची पंढरपुरात सांगता झाली.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार बबनराव लोणीकर.
तसेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक अविनाश ढेकणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.