Devendra Jadhav
वारी म्हणजे काय तर पंढरीची वारी, अर्थात ती विठ्ठलाची.
ऐतिहासिक संदर्भ पहायला गेलं तर 13 व्या शतकापासून वारीचे संदर्भ, पुरावे आपल्या आढळून येतात.
ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम अशा सकल संतांनी वारी केली आहे.
ज्या दिवशी विठ्ठल पंढरपूरात आला तेव्हापासून ही वारी सुरू झाली.
त्यामुळे ही वारी परंपरा कित्येकवर्षे चालत आली आहे.
वारीमध्ये एकी आहे, त्यात भाईचारा आहे, त्यात आनंद आहे, भक्ती आहे, प्रेम आहे
वारीमध्ये विशेष म्हणजे पांडुरंगाला भेटायची आस आहे.