पुजा बोनकिले
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूमधून प्रस्थानास सुरुवात झाली आहे.
देहु मंदिरासमोर सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे
देहूत पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची आणि भक्तांची अलोद गर्दी पाहायला मिळत आहे
देहू टाळ आणि मृदंगाच्या गजरात दुमदुमली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार मंदिरात दाखल झाल्या
मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यानी हजेरी लावली आहे
देहूत मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे.