kimaya narayan
सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे यांचा अशी ही बनवाबनवी हा सगळ्यात जास्त गाजलेला सिनेमा. हा सिनेमा सुपरहिट ठरला.
या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री पात्रही साकारलं. त्यांच्याबरोबर सचिन पिळगांवकर यांनीही स्त्री पात्र साकारलं होतं.
या दोघांची जुगलबंदी खूप गाजली. घर मालकिणीला फसवण्यासाठी त्यांनी लढवलेल्या शकली आणि त्यांची धमाल सगळ्यांनीच एन्जॉय केली.
पण तुम्हाला माहितीये का ? या सिनेमातील एक डायलॉग ठेवण्यासाठी लक्ष्मीकांत यांनी सचिन यांच्याकडे हट्ट केला होता.
सुधा आजारी पडते आणि पार्वती तिच्याजवळ बसलेली असते आणि तेव्हा सुधा तिला जाऊबाई अशी हाक मारते. तेव्हा पार्वती लगेच 'नका ना बाई इतक्यात जाऊ' असं उत्तर देते. लक्ष्मीकांत यांनी हा डायलॉग घेतल्यावर सचिन चकित झाले.
सचिन यांनी काही बोलण्याआधीच लक्ष्मीकांत हा डायलॉग ठेव असा हट्ट केला. तेव्हा सचिन यांनी पहिल्यांदा होकार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.