सकाळ डिजिटल टीम
भारतीय पोलीस दलातील सर्वात सुंदर आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत बिहार कॅडरचेच नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या आयपीएस आशना चौधरी यांचंही नाव आहे. आशना ह्या सौंदर्याच्या बाबतीत मॉडेलपेक्षा कमी नाहीत.
ही IPS अधिकारी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथील रहिवासी आहे. आशना यांनी तिसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलंय.
आशना चौधरी यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, गाझियाबाद, यूपी येथून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर श्रीराम कॉलेजमधून इंग्रजीतून पदवी मिळवली. या शिवाय, दक्षिण आशियाई विद्यापीठातूनही पदव्युत्तर पदवी घेतलीये.
माध्यमांशी संवाद साधताना आयपीएस आशना म्हणाल्या, ''पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर मी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि दररोज आठ ते नऊ तास अभ्यास करून यश मिळवलं.''
आयपीएस आशना चौधरी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत एकूण 992 गुण मिळवले होते. यामध्ये मुख्य लेखी परीक्षेचे 827 गुण आणि मुलाखतीचे 165 गुण समाविष्ट आहेत.
आशना चौधरी ह्या UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये अखिल भारतीय स्तरावर 116 वा क्रमांक मिळवून गृह संवर्गातील भारतीय पोलिस सेवा अधिकारी बनल्या.
यूपी केडरमधील 2023 बॅचच्या आयपीएस अधिकारी आशना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.
इन्स्टाग्रामवर त्या अनेकदा वेस्टर्न ड्रेसमधले फोटो शेअर करत असतात.